नेहरु युवा केंद्र,राष्ट्रीय सेवा योजना ,क्षेत्रीय कार्यालाय पुणे, युवा कार्यक्रम क्रिडा मंत्रालय भारत सरकार, पुणे महानगरपालिका,वर्शिप अर्थ फाऊंडेशन आणि वूई पुणेकर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा’ च्या निमित्ताने पुणे परिसरातील विविध भागात दिनांक १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर पर्यंत ‘स्वच्छ भारत अभियानाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. याची सुरुवात आपल्या खडकवासला गावापासून मंगळवार दि.११ ऑक्टोबर रोजी होत आहे.
तरी आपणांस विनंती आहे की या उपक्रमात आपण सहभागी होवून परिसर स्वच्छतेचा संदेश समाजात पसरविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे.